पार्सल उघडलं आणि निघाला कोब्रा... 

पार्सल उघडलं आणि निघाला कोब्रा... 


मयुरभांज : तुम्हाला एक पार्सल आलंय आणि त्यातून सामानाऐवजी साप निघाला तर?? हो अशीच घटना घडली आहे ओडिसा राज्यातील मयुरभांज जिल्ह्यातील रायरंगपूर येथे एका पार्सलमध्ये चक्क कोब्रा सापडला. हा कोब्रा या पार्सलच्या बॉक्समध्ये आला कसा याचा शोध सुरू आहे.

रायरंगपूर येथे एका व्यक्तिच्या घरी पार्सल आले. हे पार्सल उघडून बघत असताना त्यातून अचानक कोब्रा बाहेर आला. घाबरलेल्या या गृहस्थाने वनविभागाशी संपर्क साधला व त्यांनी घरी येऊन या सापाला पकडून नेले. साधारण पाच फूट लांबीचा हा कोब्रा पार्सलमध्ये बघून घरातल्यांना धडकी बसली. 

Web Title: cobra found in parcel at Odisha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com