जिल्हाधिकारी दुचाकीने पोहचले गावात अन् मान्सून पुर्व उपाय योजनांवर केली चर्चा

जिल्हाधिकारी दुचाकीने पोहचले गावात अन् मान्सून पुर्व उपाय योजनांवर केली चर्चा
bhandara

भंडारा : Bhandara लाखांदूर Lakhandur तालुक्यातील वैनगंगा Vainganga  व चुलबंद नदीच्या वेढ्यात वसलेल्या आवळी गावात Village पावसाळ्यात Monsoon निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थीतीचा  व विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी Collector संदीप कदम यांनी चक्क दुचाकीने Bike आवळी गावात जाऊन विविध समस्यांवर Problems व अडचणींवर नागरिकांशी चर्चा Discussion केली आहे. Collector Reached In Village By Bike & Discussed Pre-Monsoon Measures

 हे देखील पहा -

चुलबंद व वैनगंगा नदिचा वेढा असलेल्या लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाला नेहमीच पुराचा Flood जबर फटका बसत असतो, अश्या उद्भवणाऱ्या परिस्थितीत आवळी येथील नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी पुरातन दोंग्याने जीवघेणा प्रवास करावा लागत असतो. 

एवढेच नव्हे तर या गावातील विद्यार्थी व नागरिक यांना आरोग्य, शिक्षण यासारख्या मुलभुत अधिकारांपासून वंचित राहायची वेळ पावसाळ्यात येत असते. संबंधित परिस्थितीवर उपाय योजना ब पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटांबाबत खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पुर्व तयारी होण्यासाठी जिल्हाधिकारी कदम यांनी आवळी गावात भेट दिली आहे. Collector Reached In Village By Bike & Discussed Pre-Monsoon Measures

यावेळी जिल्ह्याधिकारी संदीप कदम यांनी गावालगतच्या वैनगंगा नदी पात्रासह गावातील प्राथमिक शाळा,पाणी पुरवठा योजना यासह अन्य शासकीय सुविधांची पाहणी केली आहे. दरम्यान पुरपरिस्थीतीत या गावातील शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल देखील माहिती जाणुन घेतली आहे.

पावसाळ्यात आवळी गावात निर्माण होणाऱ्या  पूरपरिस्थीतीवर उपाय योजना व नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला भेट देताना सोनी व आवळी गावाच्या मधोमध असणाऱ्या चुलबंद नदीपात्रातून पायी जात दुचाकीने प्रवास करुन आवळी वासियांची भेट घेतली व चर्चा केली आहे. 

Edited By : Krushnarav Sathe
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com