नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार
nana patole

चंद्रपूर: चंद्रपुरात Chandrapur भाजपने काँग्रेस Congress प्रदेशाध्यक्षांविरोधात पोलिसात तक्रार नोंदविली आहे. मागील आठवड्यात आपल्या दौऱ्यात चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रपूर मनपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पटोले यांनी केला होता. Complaint lodged against Nana Patole

या भ्रष्टाचाराच्या तक्रारी करताना काही भाजप BJP नगरसेवकही Corporator आपल्याला भेटल्याचा दावा पटोले यांनी केला होता. या वक्तव्याने अस्वस्थ झालेल्या भाजपने हा दावा खोडून काढत पुराव्यानिशी नावे द्या, असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

भाजप नगरसेवकांचा वक्तव्यात समावेश केल्याने मनपात सर्वच नगरसेवकांकडे संशयाने पाहिले जात असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसात Police ही तक्रार देण्यात आली आहे, असे भाजपने म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe 


 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com