मुंबई मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन

मुंबई मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन
conference to demand Maratha reservation 

सांगली : मराठा आरक्षणाबाबत Maratha reservation राज्य सरकार कडून चेष्टा सुरू असल्याचा आरोप करत मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार Government विरोधात मराठा आरक्षण संघर्ष समिती आता आक्रमक झाली आहे. २५ जून दिवशी मुंबई मध्ये राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून निर्णयक लढ्याची घोषणा होणार असल्याचे संघर्ष समितीकडून Committee जाहीर करण्यात आले आहे. conference to demand Maratha reservation 

समितीचे नेते सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार कडून चेष्टा सुरू असल्याचा आरोप मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समितीकडून करण्यात आला आहे. कोल्हापूर Kolhapur या ठिकाणी पहिल्यांदा घेतलेल्या गोलमेज परिषदेमध्ये मराठा आरक्षण आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीचे १४ विषय मांडण्यात आले होते.

मात्र, राज्य सरकारकडून ८ विषयांना मंजुरी दिल्याने राज्यव्यापी आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ते आंदोलन स्थगित केला होते. राज्य सरकारकडून ८ ठरावांना मंजुरी करत मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. अद्यापही त्या घोषणेची पूर्तता करण्यात आली नाही. असा आरोप मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समितिचे नेते सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक यांनी केला आहे. conference to demand Maratha reservation

हे देखील पहा  

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची Uddhav Thackeray घेतलेली भेट सुद्धा काही कामाची नाही. राज्य सरकारकडून खालच्या पातळीवरून ज्या प्रक्रिया करायचे आहेत. त्या होताना दिसत नाहीत. यामुळे आता सरकारच्या विरोधात निर्णयातील लढा उभारण्यासाठी नवी मुंबई Navi Mumbai या ठिकाणी २५ जून दिवशी मराठा समाजाची राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये राज्यातील तसेच, केंद्रातील अनेक आजी- माजी मंत्री, मराठा समाजातले खासदार, आमदार, नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com