राज्यात काँग्रेसला आघाडीशिवाय पर्याय नाही -शिवाजीराव आढळराव पाटील

राज्यात काँग्रेसला आघाडीशिवाय पर्याय नाही -शिवाजीराव आढळराव पाटील
WhatsApp Image 2021-06-03 at 1.50.05 PM.jpeg

पुणे - राज्यात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची आघाडी अभ्यध्य असुन ती कायम रहाणार आहे त्यातही काँग्रेस Congress स्वतंत्र लढण्याची भाषा करत असेल मात्र काँग्रेसला पुढील काळात "आघाडीशिवाय पर्याय नसल्याचे" स्पष्ट मत शिवसेनेचे Shivsena माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी Shivaji Adhalrao Patil काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या Nana Patole विधानाला लक्ष केले आहे. The Congress has no choice but to lead in the state

आढळरावपाटील पुणे नाशिक महामार्गवरील बाह्यवळणाच्या कामाच्या पहाणी दरम्यान माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साम टिव्हिच्या एक्सक्युजिव मुलाखतीत 2024 च्या विधानसधा निवडणूकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहिर केले होते.

मात्र कॉंग्रेसमधील काही नेते स्वबळाची भाषा करत आहे मात्र पुढील काळात कॉग्रेसला आघाडी शिवाय पर्याय राहिलेला नाही असं म्हणत आढळरावपाटलांनी कॉग्रेसला लक्ष केलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com