पेट्रोल, डिझेल, दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने...

पेट्रोल, डिझेल, दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने...
Congress protests against petrol diesel price hike

जालना : पेट्रोल Petrol, डिझेल Diesel, गॅसच्या दरवाढीविरोधात जालन्यात काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली आहेत. शहरातील अंबड चौफुलीवरील जांगडे पेट्रोल पंपावर ही निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे  Congres पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. Congress protests against petrol, diesel, price hike

आंदोलन दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा निषेध नोंदवला. यावेळी, कारकर्त्यांनी केंद्र सरकार Central Government विरोधात, घोषणाबाजी करून पेट्रोल, डिझेल आणि गॅसची केलेली दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. दर वाढ मागे न घेतल्यास केंद्र सरकार विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा काँग्रेस कडून देण्यात आल आहे.

पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात लातूर जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने आंदोलन

दुसरकीकडे, लातूर latur मध्ये दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसून येते आहे. पेट्रोल शंभरी पार ओलांडल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. कोरोना संकटनंतर आता इंधन दर Rate वाढ होत असल्याने सर्व सामान्यांपुढे मोठं संकट आहे. लॉकडाऊन Lockdown मध्ये सर्व व्यवहार बंद असल्याने लोकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. Congress protests against petrol, diesel, price hike

पहा व्हिडिओ 

दिवसागणिक पेट्रोलच्या किंमती वाढतच आहे. यामुळे जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून इंधनाच्या किंमती वाढत असल्याने लातूर मधील शहर काँग्रेसच्या वतीने कावळे पेट्रोल पंप, थोरमोठे पेट्रोल पंप, कामदार पेट्रोल पंप, उषाकिरण पेट्रोल पंप या ठिकाणी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे. लातूर शहरासह निलंगा Nilanga, उदगीर Udgir, अहमदपूर या ठिकाणी सुध्दा आंदोलन करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com