काँग्रेसने कॅबिनेट मधून बाहेर पडावे - प्रकाश आंबेडकर

काँग्रेसने कॅबिनेट मधून बाहेर पडावे - प्रकाश आंबेडकर
prakash ambedkar.jpg

अकोला - आपत्ती व्यवस्थापनच्या कायद्याचा वापर करून काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार vijay wadettiwar यांनी अनलॉक Unlock जाहीर केलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी CM ते रद्द केलं. हे चुकीचं असून,  आपत्ती व्यवस्थापनचे निर्णय लागू झाले पाहिजे , मात्र मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे आणि हे महाराष्ट्राच्या Maharashtra  संस्कृतीला न पटणारं आहे, कारण सध्या आपत्ती व्यवस्थापनचा हाच निर्णय लागू झाला तर, मुख्यमंत्र्यांची नाचक्की आहे. यांच्या खेळामध्ये सामान्य भरडला जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी Prakash Ambedkar केला आहे.  Congress should get out of the cabinet says Prakash Ambedkar

हे देखील पहा -

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "एका मंत्र्यांचा अपमान होत असेल तर काँग्रेसने कॅबिनेट मधून बाहेर पडावं असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे, दरम्यान ते म्हणाले एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीका ही करायची अश्या दोन गोष्टी एकावेळी चालत नाही. काँग्रेसनेही ते करावं, टीका करायची टीका करा आणि सत्तेत राहायचं असेल तर सतेत रहा. वडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केलं तर मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे, आणि मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा निर्णय बदल करून लागु केला तर हा मंत्र्यांचा अपमान आहे, म्हणून दोघांपैकी एकाने राजीनामा द्यावा असा सल्ला सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे".

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com