पेट्रोल दरवाढ थांबायचं नाव घेईना !

पेट्रोल दरवाढ थांबायचं नाव घेईना !
petrolpetrol

यवतमाळ : पेट्रोल Petrol आणि डिझेलच्या Diesel दरात Price सातत्याने भाववाढ Increase होताना दिसत आहे. सध्या यवतमाळ Yavatmal येथे पेट्रोलचा दर हा १०२.२६ रुपये डिझेलचा दर हा ९२.८१ रुपये इतका आहे. Consistent petrol price hike 

पेट्रोल आणि डिझेलमध्ये सातत्याने वाढ होत आहे.  यवतमाळमध्ये आज पेट्रोलचे दर हे २६ पैशांनी तर डिझेलचे दर हे १९ पैशांनी वाढले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात रोज सकाळी ६ वाजता बदल होत असतो. दररोज सकाळी ६ वाजताच नवे दर लागू होत असतात. 

परकीय चलन दरासह आंतरराष्टीय बाजारात कच्या तेलाच्या किमती काय आहे यानुसार रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो. रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे मात्र सर्वसामान्यांचे मात्र कंबरडं मोडलं आहे. Consistent petrol price hike

सध्या शेतीची कामे चालू आहेत. मजुरी परवडणारी नसल्याने शेतकरी सर्व कामे यांत्रिकी पद्धतीने करतात. जेंव्हा वीज नसते तेंव्हा उन्हाळी पिकांना डिझेल वर चालणाऱ्या पंपाच्या साहाय्याने शेतीत पाणी टाकले जाते.

हे देखील पहा -

अशातच डिझेलचे भाव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. अशा स्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल ,डिझेलची  ज्या पद्धतीने दरवाढ केली आहे ही क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. Consistent petrol price hike

Edited By : Krushanrav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com