प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यासाठी काँग्रेस पक्षाकडून वर्गणी ! 

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यासाठी काँग्रेस पक्षाकडून वर्गणी ! 
congress

बुलढाणा : भारतीय जनता पक्षाचा BJP बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष संघटन कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे.

यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole हे विदर्भाच्या Vidarbha दौऱ्यावर आहेत. विदर्भातील गोंदियामधून या दौऱ्याला सुरुवात सुरूवात झालेली असून उद्या ९ आणि १० रोजी पटोले हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.

मात्र त्यांच्या दौऱ्यासाठी होणार खर्च Expenditure कोण करेल ? या विवंचनेतून जळगाव Jalgaon जामोद विधानसभा मतदार संघात मोडणाऱ्या शेगाव शहरातील नेते व कार्यकर्ते जाम टेन्शन मध्ये आहेत. नेते मंडळी शहरात येत असतील तर त्याचा खर्च पक्ष नेत्याने अथवा जिल्हाध्यक्ष यांनी करावा हे आतापर्यंतचे अलीखीत नियम आहेत.

मात्र या ठिकाणी खर्चाचा डोंगर आपण पेलू शकत नाही म्हणून मंगळवारी शेगावात एक नियोजनासाठी बैठक पार पडली. या बैठकीत पटोलेंच्या दौऱ्यासाठी लागणारे होर्डिंग, वृत्तपत्र जाहीराती व इतर खर्च कॉन्ट्रीब्युशन Contribution मधून करू अश्या सूचना या मतदार संघाच्या पक्षनेत्या सौ.स्वाती वाकेकर यांनी मांडल्या आहेत.

हे देखील पहा -

आपण फक्त १५ हजार रुपयेच देऊ शकतो बाकीचे पैसे वर्गणीतून गोळा करा असा मोलाचा सल्ला देत मॅडम जळगाव कडे निघून गेल्या. मात्र या सूचनेने काही नेत्यांसह कार्यकर्ते तीव्र नाराज झालेत.

मागील १० वर्षात पक्षनेते राहिलेले रामविजय बुरुंगले यांनी इतर नेते किंवा कार्यकर्त्यांकडून वर्गणी कधीच गोळा केली नाही. व सर्व खर्चाचा भर स्वतः उचलला मात्र नवीन पक्षनेत्यांनी वर्गणी चा नाव फंडा पक्षात रोखल्याने पक्षात पक्षनेत्याविरुद्ध तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com