कोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित
3d Mask.jpg

कोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित

पुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. कोविड हा संसर्गजन्य आजार असल्याने या काळात  केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाकडून मास्क वापरण्यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत. मात्र अद्याप पर्यंत  कोणीही बाजारात उपलब्ध असलेले मास्क कोरोनापासून बचाव करण्यास सक्षम असल्याची पुष्टी दिली नाही. अशातच आता एक नव्या मास्कची चर्चा बाजारात सुरू झाली आहे. पुण्यातील थिंकर टेक्नोलॉजीज्‌ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड  या कंपनीने 3डी मास्क बनवला आहे.  बाजारात उपलब्ध असलेले मास्क कोरोना विषाणूंना रोखून त्यांना नाका-तोंडात जाण्यापासून रोखत होते. मात्र, थिंकरने बनवलेला हा मास्क  नाक आणि तोंडाच्या संपर्कात आलेला  कोरोना विषाणू नष्ट करतो. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.  (Corona antiviral mask developed in India) 

थिंकर टेक्नोलॉजीज्‌ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या मास्कच्या बाहेरच्या बाजूला व्हायरोसाइड या विषाणूरोधक घटकाचा मुलामा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान विकास मंडळाकडून मास्कच्या या प्रकल्पासाठी अर्थसाह्य मिळाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रभावी मानल्या जाणाऱ्या एन-९५, वा इतर तीन पदरी आणि कापडी मास्कपेक्षा थिंकरने बनवलेला मास्क अधिक प्रभावी असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.  थ्रीडी प्रिंटिंग आणि औषधांच्या (फार्मास्युटिकल्स) एकत्रीकरणातून हा नवीन प्रकारचा मास्क तयार करण्यात आला आहे. 

थिंकर टेक्नोलॉजीजचे संस्थापक संचालक डॉ. शीतलकुमार झांबड यांनी याबाबत माहिती दिली आहे.  कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या  काळात मिळणारे घरगुती कापडाचे मास्क कमी गुणवत्तेचे असल्याचे आम्हाला आढळून आले. यातूनच एक नव्या मासकच्या निर्मितीची कल्पना आम्हाला सुचली. ठिकर  नवीन औषधनिर्मितीसंदर्भात ‘फ्यूज्ड् डिपोझिशन मॉडेलिंग’थ्रीडी-प्रिंटर विकसित करते.  त्यासाठी कंपनीने विषाणुरोधक मुलामा सूत्र विकसित करण्याचे काम हाती घेतले.  नेरूळच्या मर्क लाइफ सायन्सेसच्या सहकार्याने थिंकरने हे 3डी मास्क विकसित केले.   एन- ९५ मास्क, तीन पदरी मास्क, साध्या कपड्याचे मास्क, ३ डी प्रिंटेड किंवा इतर प्लास्टिक वेष्टित मास्कच्या तुलनेत हे 3 डी विषाणूरोधक औषधी थराचे आवरण असलेले मास्क बनवण्यात आले आहे. 

व्हायरोसाइड या विषाणूरोधक घटकाचा मुलामा देण्यात आलेले हे मास्क   सार्स -सीओव्ही -२ विषाणू निष्क्रिय करते. त्यासाठी मासकच्या कोटिंगमध्ये ‘सोडियम ऑलेफिन सल्फोनेट’ आधारित मिश्रण वापरण्यात आले आहे. साबण तयार करण्यासाठी या घटकच वापर केला जातो. यात  हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक गुणधर्म आढळून येतात. मास्कवरील ही रसायने संपर्कात आल्यावर विषाणूचे  बाह्य आवरण नष्ट करतात. तसेच रसायने सामान्य  तापमानात टिकून राहू शकतात. ही रसायने सौंदर्यप्रसाधनांमध्येही मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com