#corona effect तब्बल 6 तास लागत आहेत मुंबई विमानतळाहून बाहेर निघताना

#corona effect तब्बल 6 तास लागत आहेत मुंबई विमानतळाहून बाहेर निघताना
corona scan on mumbai airport

मुंबई - कोरोनाचा फटका आता विमान प्रवाशांनाही बसतो आहे. कारण मुंबई विमानतळावर कोरोना स्कॅनिंगसाठी तब्बल ६ तास वाट पाहावी लागते आहे. या स्कॅनिंगसाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कुठलाही कोरोनाग्रस्त तपासणीतून सुटू नये म्हणून प्रशासनाकडून काळजी घेतली जाते आहे. प्रत्येक प्रवाशाची कसून चाचण्या सुरु आहेत. त्यामुळं हा वेळ लागत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आता 43 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. आहे. त्यामुळे कोरोनाची दहशत संपूर्ण देशात पसरल्याचं पाहायला मिळतंय. सर्वच विमानतळांवर कसून तपासणी केली जाते आहे. इतर देशांतून आलेल्या प्रवाशांमधून कोरोनाचा संसग वाढू शकतो, अशी भीती असल्यामुळे खबरदारी बाळगण्यात येते आहे. त्यासाठी कसून तपासण्या केल्या जात आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तर प्रवाशांना बाहेर यायला तब्बल 6 तास लागत असल्यानं प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत असल्याचा सूर आळवला जातोय. 

केरळमध्ये एका तीन वर्षांच्या बालकालाही लागण झाल्याचं समोर आलं आहे. या मुलाचे कुटुंबीय नुकतेच इटलीहून परतले होते. या बालकाला एर्नाकुलम मेडिकल कॉलेजच्या विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. या विषाणूच्या संक्रमणामुळे इटलीत आतापर्यंत 366 आणि अमेरिकेत 21 लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, कोविड-19 शी संबंधित घटना पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला बांगलादेश दौरा रद्द केला आहे. तर, केरळमध्ये एका तीन वर्षांच्या चिमुकलीला करोनाची लागण झाली आहे. इकडे शरद पवार यांनीही देखील आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. संपूर्ण जगभरात कोरोनाचा परिणाम दिसून येतोय. 

पाहा व्हिडीओ - 

corona effect on mumbai airport delay passengers

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com