चंद्रपूरात कोरोनाबाधितांवर केले जात आहेत निःशुल्क उपचार...

चंद्रपूरात कोरोनाबाधितांवर केले जात आहेत निःशुल्क उपचार...
doctor giving advice

चंद्रपूर : कोरोना Corona काळात चहूबाजूंनी नकारात्मक वार्ता येत असताना चंद्रपुरातून,एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोविड Covid रुग्णांवर भरमसाठ शुल्क आकारत उपचार करणाऱ्या डॉक्टर मंडळींच्या डोळ्यात अंजन घालत एका महिला डॉक्टरने आपल्याकडे येणाऱ्या सर्वच रुग्णांवर निशुल्क उपचार करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या निशुल्क सेवेला रुग्णांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. Corona Free treatment is being given to the victims

चंद्रपूरसह Chandrapur राज्य व देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील बहुतांश रुग्ण कोणतेही लक्षणे नसणारे आहेत. या रुग्णांना कोविड संबंधी बातम्यांमुळे विविध चाचण्या, सिटीस्कॅन, इंजेक्शनच्या रांगा यातून नाहक जावे लागत आहे. चंद्रपुरात घरातच विलगीकरण केलेल्या कोरोना रुग्णांना डॉक्टर मंडळी ३ ते ६ हजार रुपये प्रतिरुग्ण शुल्क आकारत आहेत. गेल्या वर्षभर मंदीचा काळ असताना आर्थिकदृष्ट्या ढासळलेल्या कित्येक रुग्णांना हा भार पेलवणारा नाही.

अशातच आपण घेतलेले शिक्षण या महाकाय संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या कामी यावे, यासाठी चंद्रपूरच्या महिला डॉ. अभिलाषा गावतुरे Abhilasha Gavature यांनी एक मोठा निर्णय घेतला. अस्वस्थ झालेल्या- मानसिकदृष्ट्या खचलेल्या व आधाराची गरज असलेल्या रुग्णांसाठी  त्यांनी निःशुल्क उपचार सुरू केला आहे. समाज माध्यमांवर त्यांनी आपला मनोदय जाहीर करताच रोज ८० ते १०० रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी प्रमाणपत्र मागत उपचार करून घेत आहेत. या कठीण प्रसंगी सर्वांनीच असे करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. Corona Free treatment is being given to the victims

डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी निःशुल्क सेवा देण्याचा मनोदय जाहीर करताच त्यांना रोज शेकडो फोन कॉल्सला उत्तर द्यावे लागत आहे. कोविड रुग्णांनी अशा पद्धतीच्या सेवाभावी वृत्तीची गरज असल्याचे सांगत यांच्या प्रयत्नांना भरभरून पाठिंबा दिला आहे. एकदा व्यक्ती कोरोनाबाधित झाला की त्यावर होणारा खर्च रुग्णवाहिका, औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडीसीविर इंजेक्शन यामुळे रुग्ण व कुटुंब यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होते. मात्र समाजात अशा सेवाभावी वृत्तीचे शेकडो डॉक्टर्स पुढे आल्यास यातून मार्ग काढता येणे शक्य आहे.

Edited By- Digambar Jadhav

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com