कोरोनाचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 27 कोटींचा फटका

कोरोनाचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 27 कोटींचा फटका
vittal rukmini temple

लाॅकडाऊन (Lockdown) काळात मंदिर समितीला सुमारे 27 कोटी रूपयांचा फटका बसला आहे. तर या तीन महिन्यात 4 कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. 2020 च्या मार्च महिन्यात मंदिर भाविकांसाठी बंद झाले. त्यानंतर आठ महिन्यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर भाविकांसाठी सुरू झाले. मात्र मुखदर्शन आणि ऑनलाईन सुविधा असल्याने भाविकांचा अल्प प्रतिसाद होता. कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आल्यानंतर पुन्हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.(Corona hits Rs 27 crore to Vitthal Rukmini Temple Committee)

यामुळे मंदिर समितीला मिळणाऱ्या देणगीमध्ये कमालीची घट झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुरळीत सुरू असताना मंदिर समितीला 32 कोटी रूपये देणगी मिळत होती. पण यंदा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला  जेमतेम 6 कोटी रूपये देणगी मिळाली आहे.(Corona hits Rs 27 crore to Vitthal Rukmini Temple Committee)

लाॅकडाऊन काळात सामाजिक उत्तर दायितत्व म्हणून मंदिर समितीने  विविध उपक्रमाच्या माध्यमातून 5 कोटी रूपये मंदिर समितीने खर्च केले आहेत. कोरोना काळात  मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटीची मदत देखील केली आहे. तरी ही कोरोना काळात मंदिर समितीची शक्य तितकी मदत सुरू असताना दुसरीकडे मात्र उत्पन्नात घट झाली आहे.

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com