अमरावतीच्या ग्रामीण भागात कोरोनाचा स्फोट; तिवसा-धारणीत कडक लाॅकडाऊन

अमरावतीच्या ग्रामीण भागात कोरोनाचा स्फोट; तिवसा-धारणीत कडक लाॅकडाऊन
Tivasa Nagar Panchayat Lock Down

अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा स्फोट झाला असून गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील Amravati ग्रामीण भागात कोरोना Corona चे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. Corona Increasing in Amravati Rural Sector

अमरावती Amravati जिल्ह्यातील तिवसा शहर व धारणी शहरात आज पासून कडक लॉकडाऊन  Lock Down लावण्यात येणार असून फळ विक्रेते,किराणा दुकान व भाजीपालांचे दुकानेही बंद राहणार आहेत.

यासोबतच मेडिकल व कृषी दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. किराणा माल घरपोच सेवा पुरवण्याची परवानगी तहसीलदार यांनी दिली आहे. तिवसा नगरपंचायत व धारणी नगरपंचायत क्षेत्रातील रहदारीचे सर्व रस्ते सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले असून नागरिकांना घराबाहेर निघण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

अकोल्यात डाॅक्टर संपावर
दरम्यान, अकोला Akola येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय Medical College व सर्वोपचार रुग्णालयात कोविड कक्षात रुग्ण सेवा देणा-या १५० इंटर्न डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही,  अशी भूमिका इंटर्न डॉक्टरांनी घेतल्याने रुग्णसेवा प्रभावित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. Corona Increasing in Amravati Rural Sector

संपूर्ण राज्यात कोरोनाने कहर केला आहे. अकोल्यातही कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील कोविड कक्षात कार्यरत असलेल्या इंटर्न डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागील वर्षी पेक्षाही यावर्षी आलेली कोविडची दुसरी लाट भयावह आहे. मेडिकल कॉलेज १२ तास सेवा देणा-या इंटर्न डॉक्टरांना केवळ ३६० रुपये प्रतिदिन भत्ता दिला जात आहे. 

आपला जीव धोक्यात घालून महामारीशी लढतांना रुग्ण सेवा देणा-या डॉक्टरांवर शासनाकडून मोठा अन्यायच होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्षात मोठ्या प्रमाणात रुग्ण दैनंदिन भरती होत आहेत. Corona Increasing in Amravati Rural Sector

त्यात या रुग्णांची सेवा देणा-या वैद्यकीय यंत्रणेतील डॉक्टरांना कुठल्याही सुविधा नसल्याने नाराजीचा सूर उटमत आहे. त्यामुळे या इंटर्न डॉक्टरांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. एकाला एक न्याय व दुस-याला दुसरा ही भूमिका बदलवून आम्हालाही न्याय द्यावा अशी अपेक्षा इंटर्न डॉक्टरांनी केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com