चिंताजनक! पुण्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह पेशंट
MAHARASHTRA_corona

चिंताजनक! पुण्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह पेशंट

पुणे - पुण्यात आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. हा पीडित नेदरलँड आणि फ्रान्सचा दौरा करुन 14 मार्च रोजी पुण्यात आला होता. या नव्या रुग्णामुळे पुणे आणि पिंपरी परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या 18 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 42 जणांना कोरोनाने ग्रासल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, पुण्यात जमावबंदी करण्यात आली असून कोरोनाला रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. 

पुण्यात शुकशुकाट

दुसरीकडे कोरोनामुळे पुण्याचे रस्ते ओस पडलेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने कडक उपाययोजनांना सुरुवात केली आहे.. तसंच नागरिकांनीही घरोत राहणच पसंत केलं आहे. त्यामुळे बाजारपेठांसह पुण्यातल्या महत्वाच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय. कोरोनामुळे नागरिकांनी एकत्र जमण्यावर बंधन घातली जाता आहेत. व्यापाऱ्यांपाठोपाठ शहरातील हॉटेल, बार-रेस्टॉरंटही 3 दिवस बंद आहेत.

पुण्यात महत्त्वाची कार्यालयं बंद

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुण्यात आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देणं बंद करण्यात आलं आहे. ३१ मार्चपर्यंत या सुविधांना स्थगिती देण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली आहे. पुणे शहरातील कोरनाग्रस्त रुग्णांची संख्या  सर्वाधिक  असल्याने आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

pune corona virus covid 19 international maharshtra patient increse in maharashtra

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com