कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण देह भान विसरून कीर्तनात दंग..!
बीड

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण देह भान विसरून कीर्तनात दंग..!

बीड - बीडच्या Beed शिरूरघाट Shirurghat येथील लताई कोव्हिड Covid केअर Care सेंटरमध्ये Center, रूग्णांचे Patients मनोबल Confidence वाढविण्यासाठी व मानसिक आधार मिळावा यासाठी, किर्तनाचे Kirtan आयोजन करण्यात आले होते. Corona Positive Patients Get Involved In 'Kirtan'

हे देखील पहा -

या कीर्तनात अक्षरशः कोरोना Corona पॉझिटिव्ह रुग्ण देह भान विसरून दंग झाले होते. विठू नामाचा गजर करत 2 तास हा कीर्तनाचा सोहळा कोविड सेंटरमध्ये रंगला होता.ग्रामीण भागातील कोरोणा रुग्णांची सोय व योग्य उपचार मिळावेत, यासाठी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शिरूरघाट येथे सुमंत धस यांनी आईच्या नावाने लताई कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

या ठिकाणी कोरोना बाधित व्यक्तीवर मोफत उपचार केले जातात. तसेच त्यांच्या आहारावर विशेष लक्ष दिले जाते. त्याच बरोबर रुग्णाचे मानसिक आरोग्य चांगले राहावे या साठी भजन,योगा ,व्यायाम रुग्णांकडून करून घेतला जातो. Corona Positive Patients Get Involved In 'Kirtan'

ग्रामीण भागातील कोव्हिड केअर सेंटर असल्यामुळे लोकांना भजन-कीर्तनाची आवड असल्यामुळे, कोव्हिड सेंटर मध्ये सायंकाळी कीर्तनाचे आयोजन केले होते. सायंकाळी 6 वाजता यात युवा कीर्तनकार प्रकाश महाराज साठे यांनी, टाळकरी मंडळी सह कीर्तनाला सुरुवात केली.

यावेळी काही वेळातच कोव्हिड केअर सेंटर मधील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. आजार विसरून महिला पुरुष असे तब्बल 70 रुग्ण यात तल्लीन झाले होते. 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम' चा गजर करत टाळ-मृदंगाच्या तालात रंगून गेले. या दोन तासात सकारात्मक ऊर्जा मिळाल्याच रूग्णांनी बोलून दाखवले आहे. Corona Positive Patients Get Involved In 'Kirtan'

दरम्यान लताई कोव्हिड केअर सेंटर मधील बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. किर्तन भजनामध्ये तल्लीन होताना त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि याच उर्जेमधून त्यांनी कोरोनावर मात करावी. या हेतूने आम्ही कीर्तनाचे आयोजन केल्याचे सेंटरचे संचालक सुमंत धस यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com