पुणेकरांना दिलासा, कोरोना लाट ओसरली... (पहा व्हिडीओ)

पुणेकरांना दिलासा, कोरोना लाट ओसरली... (पहा व्हिडीओ)
Corona second wave receded in Pune

पुणे: मुंबई Mumbai पाठोपाठ आता पुणेकरांसाठी Pune सुद्धा दिलासादायक बातमी आहे. अवघ्या तीन आठवड्यातील पुण्यातील ॲक्टिव Active कोरोना रुग्णसंख्या २२ हजारांनी कमी झाली आहे. रुग्ण संख्या जेवढ्या वेगाने वाढली तेवढ्याच वेगाने कोरोना रुग्ण संख्या घटल्याचे पुण्यात पाहायला मिळत आहे. Corona second wave receded in Pune

पुण्यात ऍक्टिव्ह रुग्ण संख्येत मोठी घसरण झाली आहे. तीन आठवड्यात रुग्ण संख्या तब्बल २२ हजारांनी घटलेली आहे. वेगाने आलेली दुसरी लाट Second Wave वेगाने ओसरताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील स्थिती आता वेगाने बदलत आहे. पुण्यातला कोरोना रुग्ण वाढीचा आलेख झपाट्याने कमी होऊ लागलेला आहे. 

१८ एप्रिल ला पुण्यात ५६ हजार ३३६ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण होते. तीन आठवड्यानंतर म्हणजेच ९ मे रोजी रुग्णांची संख्या ३० हजार ७३२ एवढी झाली. वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे कोरोना रुग्ण संख्या वेगाने कमी झालेली आहे असे म्हणले जात आहे. Corona second wave receded in Pune

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांनी पुण्याच्या सध्याच्या स्तिथीबद्दल सांगितले कि, महानगरपालिका, आरोग्य यंत्रणा सक्षम पणे उभी राहिली. त्याच्यामध्ये लोकांनी चांगले काम केले. लॉक डाऊनचा चांगला पर्याय अवलंबिला गेला. त्यामुळे एकूणच गेल्या १८ एप्रिल नंतर पुण्यात रोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णसंख्या  बघता त्यात त्याच्या तुलनेत डिस्चार्ज भेटण्याची संख्या वाढत गेली. ३० दिवसानंतर या शहरातली कोरोनाचे रुग्ण संख्या ती जवळपास 23 हजाराने खाली आलेली आहे.

सकारात्मक बाब म्हणजे पुण्यात १००० ऑक्सिजन बेड Oxygen Beds रिकामे आहेत. शिवाय हे बेड मिळण्यात ही फारशा अडचणी येत नाही. जेवढ्या वेगाने लाट आली तेवढ्याच वेगाने ती शांत झालेली दिसून येत आहे हे, दिलासादायक म्हणावे लागेल. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com