Video | आपण कोरोनाच्या दुस-या स्टेजवर आहोत! तिस-या स्टेज गाठल्यास काही खरं नाही

Video | आपण कोरोनाच्या दुस-या स्टेजवर आहोत! तिस-या स्टेज गाठल्यास काही खरं नाही
CORONA_01_960 X 540


मुंबई -  एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आता कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं आव्हान भारतापुढे उभं राहिलंय. 

महामारीला कारणीभूत ठरणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रभाव भारतात आणखीन वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जागतिक साथीच्या दुसऱ्या टप्प्यावर भारत पोहोचला असून, ही साथ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यापासून रोखण्याकरता भारताकडे केवळ 30 दिवसांचा अवधी आहे, असा दावा करण्यात आलाय.  नाहीतर  कोरोनाची साथ दाही दिशांनी पसरण्याची भीती असल्याचा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनाची साथ किमान तिसऱ्या  टप्प्यात रोखण्याचे मोठे आव्हान भारतासमोर उभं ठाकलं आहे.  दुसऱ्या स्टेजवर महाराष्ट्रासह भारत उभा आहे. याच टप्प्यावर कोरोनाला रोखता आले किंवा तिसरा टप्पा लांबवता आला तर ते मोठे यश ठरेल.

असे आहेत कोरोना पसरण्याचे चार टप्पे

  • 01) कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात, कोरोना बाधित देशांमधून प्रवाशांचं भारतात आगमन
  • 02) परदेशातून आलेल्यांमुळे स्थानिकांना संसर्गाला सुरुवात.. महाराष्ट्रासह भारतात पसरली लाट
  • 03) तिसऱ्या टप्प्यात विशिष्ट समूहांमध्ये कोरोना लागण होण्यास सुरुवात.. मोठा परिसर व्यापला जातो
  • 04) कंट्रोल न केल्यास देशात वणव्यासारखा कोरोना पसरण्याची शक्यता, तर चीन, इटलीनंतर भारतात महामारीची स्थिती होण्याची भीती

पाहा सविस्तर रिपोर्ट - Video 

देशातील कोरोनाग्रस्तांच्या राज्यात महाराष्ट्र सगळ्यात पुढे आहे. काल एका दिवसात राज्यात कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. राज्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असून, आतापर्यंत 31 जणांना राज्यात कोरोनाची बाधा झाली आहे. तर सौदी अरेबिया येथील उमरा या धार्मिक यात्रेवरून भारतात परतलेल्या एका 71 वर्षीय कोरोना संशयित वृद्धाचा काल बुलडाणा येथे मृत्यू झाला. महाराष्ट्रातील हा पहिला कोरोना बळी ठरलाय.

दुसरीकडे राज्यातील कोरोनाचा फैलाव आता मुंबईबाहेर ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतही झाल्याचं स्पष्ट झालंय... पुण्यात आतापर्यंत सर्वाधिक 10, पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये प्रत्येकी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तसंच नागपूरमध्ये 4 पॉझिटिव्ह रुग्ण असून पनवेल, कल्याण, नवी मुंबई, ठाणे, नगरमध्ये प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त समोर आला आहे. याशिवाय यवतमाळमध्ये 2 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

पाहा व्हिडीओ -  BREAKING | महाराष्ट्र बनला कोरोना व्हायरसची राजधानी

Mumbai Navi Mumbai Covis-19 Corona Virus Kalyan Patient Pimpari Pune Panvel Thane Ahamadnagar Yavatmal Health State Shivsena Mumbai mahaaghadi

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com