COVID-19 Maharashtra: राज्यात  21,273 नवीन रुग्ण; 34,370 रुग्णांनी केली कोरोनावरती मात

COVID-19 Maharashtra: राज्यात  21,273 नवीन रुग्ण; 34,370 रुग्णांनी केली कोरोनावरती मात
covid-19

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. परंतु, आता तो आकडा 20 हजाराच्या आसपास येऊन थांबला आहे. महाराष्ट्रामध्ये लागू असलेल्या कडक लॉकडाऊनचा (Lockdown) कोरोनाची आकडेवारी कमी करण्यास फायदा होत आहे.  कमी होणारी रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार 1 जूननंतर निर्बंध शिथिल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (COVID-19 Maharashtra: 21,273 new patients in the state; 34,370 patients overcame)

मागच्या 24 तासात राज्यात  21,273 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर, 34,370 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 56,72,180 रुग्ण आढळले असून 52,76,203 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 425 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात  91,341 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3,01,041 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,40,86,110 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

  हे देखील पाहा 

दरम्यान, कमी होणारी रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार 1 जूननंतर निर्बंध शिथिल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेची तयारी अगोदरच सुरु झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु, आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन उठणार का याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.  

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com