महाराष्ट्र जिंकतोय कोरोना हारतोय!; 24 तासात 10,891 कोरोना रुग्ण

महाराष्ट्र जिंकतोय कोरोना हारतोय!; 24 तासात 10,891 कोरोना रुग्ण
corona update

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात कोरोनाची (Coronavirus) आकडेवारी कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) रुग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढत होती. परंतु, आता रुग्णसंख्या 10 हजारांवर आली आहे. महाराष्ट्रामध्ये लागू असलेले कडक निर्बंध (Lockdown) कोरोनाची आकडेवारी कमी करण्यास फायदेशीर ठरले आहेत. महाराष्ट्रात जवळपास सर्वच शहरात शिथिलता देण्यात आलेली आहे. (COVID-19 Maharashtra Maharashtra is winning, Corona is losing)

मागच्या 24 तासात राज्यात 10,891 रुग्ण आढळले आहेत.  त्याचबरोबर, 16,577 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 58,52,891 रुग्ण आढळले असून 55,80,925 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात  295 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात  1,01,172 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1,67,927 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,69,07,181 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असताना एका बाजूला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरु झाली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली की 18 वर्षाच्या वरील सर्वांचं मोफत लसीकरण केंद्र सरकार करेल. या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com