अवघ्या पाच दिवसात भगवान महावीर लेडीज होस्टेलमध्ये कोविड सेंटर सुरु...

अवघ्या पाच दिवसात भगवान महावीर लेडीज होस्टेलमध्ये कोविड सेंटर सुरु...
Covid Hospital

सांगली : राजमती ट्रस्ट आणि जैन समाज तर्फे अवघ्या पाच दिवसात श्री.भगवान महावीर लेडीज हॉस्टेलचे Ladies Hostel रूपांतर कोविड हॉस्पिटलध्ये Covid Hopsital करण्यात आले आहे. कोरोना Corona संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात बेड मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. Covid center opens at ladies hostel  

याच परिस्थितीचे भान राखत व सामाजिक बांधिलकी जपत राजमती ट्रस्ट आणि जैन समाज तर्फे अवघ्या पाच दिवसात लेडीज हॉस्टेलचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना आणि गोरगरिबांना मोठा दिलासा मिळाला असून याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत. 

हे देखिल पहा

सांगली Sangli जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामतः कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर Ventilator ची कमतरता भासत आहे. Covid center opens at ladies hostel  

या सर्व गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करून राजमती ट्रस्ट आणि जैन समाज तर्फे अवघ्या पाच दिवसात लेडीज हॉस्टेलचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे आणि गोरगरिबांना उपचार सुरू केले आहेत. या हॉस्पिटलमध्ये 70 बेडची सोय आहे. तर आतापर्यंत 100 पेक्षा जास्त रुग्ण येथून कोरोनामुक्त होऊन बाहेर पडले आहेत.

Edited By -  Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com