लांजा उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, कोट्यावधी रुपयांची दारू जप्त

लांजा उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, कोट्यावधी रुपयांची दारू जप्त
daru japt

रत्नागिरी - राज्य उत्पादन शुल्क  State excise duty विभागाने रत्नागिरीत Ratnagiri एक मोठी कारवाई Karvai केली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जाणारा अवैद्य दारुचा Liquor साठा जप्त Confiscated करण्यात आला आहे. मुंबई - गोवा महामार्गावर चक्क 1 कोटी 60 लाख 80 हजाराची विदेशी बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे. कंटेनरमधून या दारुची वाहतूक केली जात होती याची माहिती लांजा Lanja उत्पादन शुल्क विभागला मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई करत 1 कोटी 60 लाख 80 हजाराची  विदेशी बनावटीची दारु जप्त केली. राजापूर Rajapur तालुक्यातील वाटूळ येथे लांजा उत्पादन शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केली आहे. Crores of rupees worth of liquor confiscated

जवळपास 90 हजार विदेशी बनावटीच्या दारुच्या बाटल्या यावळी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.  दारूची ही वाहतूक  एका कंटेनर मधून केली जात होती आणि हा कंटेनर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. याप्रकरणी एका आरोपली ताब्यात घेण्यात आले आहे. महम्मद अब्दुल इझाक असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com