परवानगी मिळताच नियम मोडून बार आणि वाईन शॉपवर तळीरामांची झुंबड

परवानगी मिळताच नियम मोडून बार आणि वाईन शॉपवर तळीरामांची झुंबड
liquor

यवतमाळ : कोविडचा Covid वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ब्रेक द चेन Break the Chain अंतर्गत गेल्या ६ तारखेपासून संपूर्ण यवतमाळ Yavatmal जिल्ह्यात देशी आणि विदेशी दारूचे सर्व दुकाने आणि बार बंद करण्यात आले होती. पण प्रशासनाच्या आदेशानुसार आज पासून ही दुकाने उघडण्यात आली . पण प्रशासनाने दारू विक्रीकरिता काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. परंतु तळीरामांनी दुकानावर दारू खरेदीसाठी एकदाच झुंबड उडविली आहे. Crowd for liquor purchase at bars and wine shop by breaking the rules

प्रशासनाने ग्राहकाला दारू Liquor दुकानावर किंवा बारमधून Bar दारू विकत घेता येणार नाही. मात्र फक्त ग्राहकाला दारू मागवायची असल्यास होम डिलिव्हरी Home delivery च्या माध्यमातूनच मिळणार आहे. असे असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे नियमांचे सर्रास उल्लंघन करून वाईन शॉप आणि बार मधून तळीरामांना थेट विक्री करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून दारू न मिळाल्याने तळीरामांचा घसा कोरडा पडल्याने तळीरामांनी दुकानावर दारू खरेदीसाठी एकदाच झुंबड उडविली आहे. काही जणांनी पुन्हा लॉकडाउन Lockdown लागेल या भीतीने जास्तीची दारुही विकत घेतली आहे. यामुळे पोलिसांना Police आता हस्तक्षेप करावा लागत आहे. वणीत Vani ज्या वाईन शॉपवर आणि बार मध्ये नियमांचे उल्लंघन करून दारू विक्री करण्यात आली ती दुकाने एका राजकीय मात्तब्बर नेत्याची असल्याचे समजते आहे. पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग या दुकानावर काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे . 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com