सराईत गुन्हेगारानं पिलं डेटॉल, रुग्णालयात नेल्यावर झाला पसार

सराईत गुन्हेगारानं पिलं डेटॉल, रुग्णालयात नेल्यावर झाला पसार
sonya dhotre

पुणे: अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार तुषार उर्फ सोन्या धोत्रे हवेली पोलीसांना चकवा देऊन किरकटवाडी फाट्यावरील दवाखान्यातून आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फरार झाला आहे. आरोपीवर लक्ष ठेवण्याबाबत हवेली पोलीसांनी दाखवलेला हलगर्जीपणा पोलीसांच्या अंगलट आला आहे.  सिंहगड रस्त्यावरील जयप्रकाश नारायण नगर, नांदेड (ता. हवेली) येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगार सोन्या धोत्रेवर हवेली पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.(The culprit has escaped from the hospital)

2 मे रोजी रात्रीच्या वेळी एका घरात घुसून तोडफोड करत शस्त्राचा धाक दाखवून महिलांना शीवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी संबंधीत महिलेच्या फिर्यादीवरुन हवेली पोलीस ठाण्यात धोत्रेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अटक करण्यासाठी आले असता धोत्रेने अटक टाळण्यासाठी बाथरूम मधील डेटॉल प्राशन केले.

हे देखील पाहा

त्यामुळे त्याला उपचारासाठी किरकटवाडी फाट्यावरील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस अटक करण्यासाठी येण्याच्या अगोदर सोन्या धोत्रे त्याच्या काही साथीदारांसह दवाखान्याच्या मागच्या दाराने रिक्षातून फरार झाला आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com