गोव्यात लागू केलेल्या संचारबंदीत 31 मे पर्यंत वाढ

गोव्यात लागू केलेल्या संचारबंदीत 31 मे पर्यंत वाढ
goa lockdown

गोवा - कोविड Covid नियंत्रणासाठी गोव्यात Goa लागू केलेली संचारबंदी 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्याचे 146 कोटी रुपयांचे नुकसान Damage झाल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री CM डॉ. प्रमोद सावंत Pramod Sawant यांनी आज पणजीत दिली. Curfew imposed in Goa extended till May 31

गोव्यात कोरोनाचे Corona रुग्ण वाढतच असल्याने कोविड नियंत्रणासाठी गोव्यात लागू केलेली संचारबंदी Curfew 31 मे पर्यंत वाढविण्यात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोरोना नियंत्रणासाठी टास्क फोर्सची स्थापना केली असून औषध उपचार , ब्लॅक फंगस, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट , याबाबत हा टास्क फोर्स काम करणार असून ऑक्सिजन, औषध पुरवठा आणि व्हेंटिलेटर यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न होतील.

तौक्ते वादळामुळे गोव्याच्या झालेल्या नुकसानीची आज चर्चा झाली. या वादळाचा गोव्याच्या किनारपट्टीला प्रचंड तडाखा बसला असून सर्वसाधारणपणे 146 कोटी रुपयांचा नुकसान झाले असून सार्वजनिक बांधकाम खाते, वीज आणि पर्यटन खात्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे . 137 घरांचे पूर्णता तर 410 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. Curfew imposed in Goa extended till May 31

नुकसानीचा अहवाल तयार झाले आहेत. केंद्र सरकारला हा अहवाल लवकरच सादर केले जातील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच तरुण तेजपालला Tarun Tejpal सत्र न्यायालयाने निर्दोष सोडल्या प्रकरणी  राज्य सरकार उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहितीही डॉ सावंत यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com