सोलापुरात ११, १२ मे ला संचार बंदी होणार शिथिल

सोलापुरात ११, १२ मे ला संचार बंदी होणार शिथिल
Solapur Corporation

सोलापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आज रात्री ०८ वाजल्यापासून १५ में च्या सकाळी ०७ वाजेपर्यंत आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन प्रशासनकडून जाहीर करण्यात आला आहे. मात्र आगामी रमजान ईद Ramadam आणि अक्षय्यतृतीयेच्या Akshayya Tritiya खरेदीसाठी सोलापूरकरांना Solapur मुभा देण्यात आली आहे. Curfew will be relaxed on May 11 and 12 in Solapur

पालकमंत्री Guardian Minister दत्तात्रय भरणे Dattatray Bharne यांनी याबद्दल सूचना सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आता ११ आणि १२ तारखेला सकाळी ०७ ते ११ पर्यंत रमजान,अक्षयतृतीयेसाठी, किराणा दुकानं आणि भाजीपाला विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल भरता येणार आहे. तर लॉक डाऊन संपेपर्यंत जिल्हांतर्गत एस.टी.सेवा बंद राहणार आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com