लवकरच पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार

लवकरच पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पुणे शहरातील आठही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. त्यांच्या नावांची घोषणा बुधवारी (ता. 2) सकाळी होण्याची शक्‍यता आहे. 

विधानसभेच्या मतदानासाठी अवघे 20 दिवस, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस राहिले आहेत. तरीही, विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र, भाजपने एकाच वेळी आठ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी प्रचाराला सुरवातही केली आहे. पाठोपाठ मनसेने हडपसर, कसबा, कोथरूड आणि शिवाजीनगरमधील उमेदवार जाहीर केले आहेत. "आप', "एमएआयएम'नेही काही उमेदवार जाहीर केले आहेत. तर, शहरात एकही जागा न मिळाल्यामुळे शिवसेनेचे नाराज इच्छुक मुंबईत "मातोश्री'वर पोचले आहेत. तर, काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून लढण्याचे सूतोवाच केले आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि पर्वतीमध्ये उमेदवार देणार आहे. त्यांची नावे निश्‍चित झाली आहेत. तर कॉंग्रेस कसबा, कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमध्ये उमेदवार रिंगणात उतरविणार आहे. कॉंग्रेसने फक्त शहराध्यक्ष रमेश बागवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अन्य दोन उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. तसेच, कोथरूडमध्ये आघाडीचा मित्रपक्ष नेमका कोणता, याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. 

Web Title: Curiosity about NCP candidates in pune

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com