Cyclone Yaas : पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टी भागात यास’चे थैमान सुरू  

Cyclone Yaas : पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टी भागात यास’चे थैमान सुरू  
yaas cyclone ANI.jpg

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या West bengal आणि ओडिसाच्या  Odisa   समुद्र किनाऱ्यावर यास चक्रीवादळाने Cyclone Yaas आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. यास चक्रीवादळ आज (ता. 26) दुपार पर्यंत बंगाल आणि ओडिसाच्या Odisa  किनारपट्टीवर पोहोचेल, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी चक्रीवादळाच्या धडकेनंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्याचबरोबर, चक्रीवादळाने प्रभावित सर्व राज्यांना मदत करण्यासाठी गृहमंत्रालय  24 तास तयार असल्याचे आश्वासन केंद्रसरकारने दिले आहे. (Cyclone Yaas begins in the coastal areas of West Bengal, Odisha) 

आयएमडी ने दिलेल्या माहितीनुसार 'यास' चक्रीवादळ ओडिसाच्या बालासोरच्या दक्षिणपूर्व दिशेने सुमारे 40 किमी अंतरावर आहे. दिघा समुद्राचे पाणी पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूरमध्ये निवासी भागात पोहोचले. तर आयएमडीने पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर यास’च्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये एनडीआरएफची 8 बचावपथके तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर विमानतळ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 26 मे रोजी कोलकाता विमानतळावरील सर्व कामकाज आणि सर्व उड्डाणे सकाळी 8.30 ते संध्याकाळी 7.45 पर्यंत  बंद ठेवण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूरच्या हल्दियामध्ये समुद्राच्या लाटांना उधाण आले आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे ओडिशाच्या पारदीप येथे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत.

तर, यास चक्रीवादळाचा प्रभाव  24 मे 2021 ते 27 मे 2021 पर्यंत राहील. सध्या ते बंगालच्या उपसागरात आहे. यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेशसह अनेक किनारपट्टी भागातील राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. समुद्राच्या लाटा उंचावत आहेत.  कालपासून म्हणजेच 25 मे पासून वाऱ्याचा वेग ताशी 100-110 किमी वेगाने वेगवान झाला आहे. तर काल सायंकाळपासून वाऱ्याचा वेग ताशी 125-135 किलोमीटर तर, रात्री 11.30 च्या सुमारास वारा वेग ताशी 145-155 KM / राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com