घरासह घरगुती गोदामाला आग लागल्याने शेतकऱ्याचे ४ लाखाचे नुकसान... 

घरासह घरगुती गोदामाला आग लागल्याने शेतकऱ्याचे ४ लाखाचे नुकसान... 
Damage to farmer due to fire in domestic warehouse

यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद Pusad शहरालगतच्या मुंगसाजी नगर येथील शेतकऱ्याच्या घराला आणि शेजारील खोलीच्या गोदामाला आग Fire लागली आहे. आगीमध्ये खोलीतील गोदामात ठेवलेल्या भुईमुंगासह, घरगुती उपयोगी वस्तुसह, साहित्याची राख रांगोळ झाली आहे. या आगीत ४ लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  

घराचे नुकसान झाले आहे. या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. जाफर शेख, अहेमद शेख असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जाफर शेख आणि अहेमद शेख यांच्या मालकीची  मुंगसाजी नगर येथील इमारत व राहण्यासाठी घर आहे. शॉर्ट- सर्किटमुळे Short-circuit ही आग लागल्याचे समजत आहे. 

अचानक आग लागल्याने घरातील खोलीच्या गोदामात ठेवलेले शेतातील भुईमुंगसाचे पिक, इमारतीमध्ये ठेवलेल्या घरगुती उपयोगी साहित्यासह इतर साहित्य ज्यातमध्ये आलमारी, कपाट, लाकडी पलंग, कुलर Cooler, कपडयाची संपूर्णपणे राख रांगोळी झाली आहे. आग लागल्याचे कळताच शेख जाफर हे आपल्या  मित्रासोबत तांडयामधील घर गाठले आणि आग विझविण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केले. 

हे देखील पहा 

सुदैवाने घरात कोणीच नसल्यामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या आगीत इमारतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक Financial दूरष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून न निघणारे आहे असे शेतकरी म्हणत आहेत.

Edited By- Digambar Jadhav
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com