तौक्ते चक्रीवादळाचा दुर्गाम भागाला फटका: कर्जत तालुक्यातील फळबागे आणि घरांचे नुकसान

तौक्ते चक्रीवादळाचा दुर्गाम भागाला फटका: कर्जत तालुक्यातील फळबागे आणि घरांचे नुकसान
house

रायगड: कर्जत Karjat तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुंगी Tungi, आंबेरपाडा Amberpada आणि पेठ Peth गावाला तौक्ते चक्रीवादळाने Tauktae cyclone  झोडपुन काढले आहे. या वादळामुळे तालुक्यातील फळ बागेचे देखील नुकसान केले असल्याचे समोर आले आहे. Damage to orchards and houses in Karjat taluka due to Tauktae cyclone 

सुरुवातीला हलक्या सरी बरोबर सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने रात्री धुमाकूळ घालत घरांचे नुकसान केले आहे. रायगड Raigad जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील तुंगी, आंबेरपाडा आणि पेठ आंबिवली या अति दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे छप्पर तसेच  स्मशान भूमीचे छप्पर उडून गेली आहेत. 

हे देखील पहा -

प्राण्याचे गोठे उडून  गेले आहेत. तर फळबागांचे देखील नुकसान झाले आहे. विजेची पोळ पडल्याने तालुक्याचा काही भाग रात्री उशिरापर्यंत अंधारात होता. तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे माथेरान Matheran देखील या चक्रीवादळातुन सुटले नसून, येथे सर्वाधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. घरांचे नुकसानाबरोबर, घोड्यांचे खाद्यपदार्थ देखील भिजून खराब झाले. तर झाडावरील पक्षांना आपले जीव गमवावे लागले आहेत. Damage to orchards and houses in Karjat taluka due to Tauktae cyclone 

एकूणच तालुक्यात वादळामुळे 233 घरांचे  प्रमाणात नुकसान झाले असून आहे. तर त्यातील काही  48 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते. यासोबतच या वादळामुळे विद्युत महावितरणचे MSEDCL देखील मोठे नुकसान झालेले आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com