होंडा शोरूममधील पाण्याच्या टाकीत सापडला तरुणाचा मृतदेह !

होंडा शोरूममधील पाण्याच्या टाकीत सापडला तरुणाचा मृतदेह !
The dead body of a young man was found in a water tank in a Honda showroom

लातूर: लातूर Latur शहरातील एमआयडीसी MIDC भागात असलेल्या ५ नंबर चौकात कायझन होंडा या शोरूममध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. ऑफिस बॉय म्हणून काम करणारा २९ वर्षीय सुशांत चंद्रकांत कांबळे या तरुणाचा मृतदेह शोरूमच्या दुसऱ्या मजल्यावरील १००० लिटर पाण्याच्या टाकीत मृत अवस्थेत आढळून आला आहे. The dead body of a young man was found in a water tank in a Honda showroom

पाण्यात असलेला तरुणाचा मृतदेह पोलिसांनी सदर फायबरची पाण्याची टाकी कापून बाहेर काढला आहे. सदरील मृतदेह पोस्टमार्टमसाठी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालयात Vilasrao Deshmukh Government Institute of Medical Sciences पाठवण्यात आला आहे. 

या घटनेबद्दल मृत सुशांत कांबळे याचा भाऊ आकाश चंद्रकांत कांबळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस Police ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय कदम हे करत आहेत.

हे  देखील पहा - 

दरम्यान या तरुणाचा घात की अपघात झाला याबाबत अद्याप तरी स्पष्ट झाले नसून याबाबत पोलीस तपास करत आहेत. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com