मांडवातच वधूचा मृत्यू; अनं पुढं काय झालं पाहून सगळेचं थक्क

मांडवातच वधूचा मृत्यू; अनं पुढं काय झालं पाहून सगळेचं थक्क
The death of the bride in the tent

इटावा : लग्न married ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट असते. या मंगल प्रसंगामधील आठवणी आयुष्यभर साठवून ठेवले जातात. या दिवसाविषयी नववधू आणि नवऱ्यामुलाच्या बऱ्याच इच्छा- आकांक्षा महत्वाच्या असतात. दोघांनी नव्या जीवना विषयी खूपशी स्वप्नं रंगवले असतात. परंतु, कधी-कधी दुर्दैवानं अशा आनंदाच्या प्रसंगाचं वेळी अचानकपणे दुःखाच्या डोंगराचा रूपांतर होऊ शकतं, असाच प्रकार सुरभीच्या लग्नाच्या मांडवात घडल आहे. The death of the bride in the tent

ही दुःखद कहाणी आहे, उत्तर प्रदेश Uttar Pradesh येथील इटावा Etawah मधल्या भरथना या शहरामधील आहे. इथल्या भागातील नवली गावात राहत असलेले मंगेश कुमार यांनी आपली मुलगी सुरभीचं लग्न समसपूर Samaspur मधील मुलाशी करण्याचे निर्णय घेतल होतं. मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी दिवसरात्र धावपळ करणाऱ्या बापाची वेळ शत्रूवरही येऊ नये, या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. नवीन वैवाहिक आयुष्याचं स्वप्न रंगवणाऱ्या सुरभीलाही असे काही भयंकर घडेल, अशी कल्पना सुद्धा केली नव्हती.

लग्नाच्या दिवशी मैत्रिणी, बहिणी आणि इतर नातेवाईक महिलांच्या गर्दीत सुरभी नव- वधूच्या पेहरावात नटून- थटून लग्नमंडपाच्या दिशेनं एक- एक पाऊल टाकत निघाली. मात्र, ती त्या मांडवात आल्यानंतर तिचे सर्व स्वप्नं क्षणातच संपून गेली. निपचित पडलेल्या सुरभीला तपासत डॉक्टरांनी doctor तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. एकाएकी आलेल्या हृदय विकाराच्या झटक्यानं नववधू सुरभीच्या मृत्यू झाल्याचं स्पष्ट करताच, सर्व काही होत्याचं नव्हतं झालं. नवरदेवही सुन्न झाला. सर्व नातेवाईक मंडळी, वरातीमधून नवरीला घरी नेण्यासाठी आलेले लोक जागीच थिजले. आई-वडिलांच्या दुःखाला तर पाराच उरला नव्हता. काही वेळापूर्वीच्या आनंदाच्या हसऱ्या वातावरणाची संपूर्णतः शांतता पसरली, काय करावं, ते कुणालाच सुचेत नव्हतं. The death of the bride in the tent

अखेर काही सुज्ञ, समजूतदार लोकांनी या परिस्थितीवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतल. काही वेळाच्या चर्चेनंतर नवरदेवाचं लग्न सुरभीच्या धाकट्या बहिणीशी  करण्याचा विचार समोर आल. मोठा समजूतदारपणा दाखवत नवरदेव आणि सुरभीची धाकटी बहीण निशा यांनीही या गोष्टीला होकार दिल. आई-वडिलांनीही दुःख बाजूला ठेऊन एका मुलीचा मृतदेह समोर असतानाच, दुसऱ्या मुलीला सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला. सर्वांनाच या गोष्टीचे जड वाटत लग्न पार पाडलं.

हे देखील पहा 

सुरभीचा भाऊ सौरभने सांगितलं की, सुरभी आम्हाला अशा प्रकारे सोडून गेल्यानंतर पुढं काय करायचं, हे कोणालाच समजत नव्हतं. मग कुणीतरी सुचवलं की, माझी लहान बहीण निशाचं याच मांडवात नवरदेवाशी लग्न करून टाकावं. आम्ही सर्वजण या गोष्टीला सहमत झालो. सुरभीचा मृतदेह एका खोलीत ठेवण्यात आल. तर, दुसऱ्या खोलीत धाकट्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु होती. लग्नानंतर निशा सासरी निघून गेल्यावर सुरभीवर अंत्यसंस्कार करण्यात आल. आम्हा सगळ्यांसाठीच हा अत्यंत कठीण काळाचा प्रसंग होता.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com