प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू 
Death of famous southern actor Vijay Sanchari

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू 

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay  यांचं बाईक अपघातामध्ये निधन झालं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील Tollywood एक नामांकित म्हणून विजय यांची ओळख होती.  त्यांचा अपघात शनिवारी सकाळी बाईकवरुन प्रवास करताना झाला आहे. Death of famous southern actor Vijay Sanchari 

या अपघात दरम्यान त्यांच्या मेंदूला Brain जबरदस्त मार लागला होता. अपघातानंतर त्यांना त्वरीत एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान ते कोमात केले. अन् अखेर त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. 

संपूर्ण सिनेसृष्टीत विजय यांच्या निधनामुळं शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बाईकवरुन प्रवास करायला  विजय यांना आवडत असे. 

पाऊस पडल्यामुळं रस्ते गुळगुळीत झाले होते. अन् या गुळगुळीत रस्त्यावर त्यांची बाईक घसरुन अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता अशी माहिती मिळाली आहे. जखमी झाल्याने आसपासच्या लोकांनी त्यांना रुग्णालयात भरती केले.

हे देखील पहा- 

परंतु या अपघातात त्यांचं तोपर्यंत डोकं फुटल्यामुळे भरपूर प्रमाणात रक्त वाहून गेल होत. या रक्तस्रावामुळे ते कोमात गेले. डॉक्टरांद्वारे त्यांच्यावर सलग ४८ तास तज्ज्ञ उपचार सुरु होते. परंतु त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर उपचारादरम्यान संचारी विजय यांची प्राणज्योत मालवली. 

Edited By - Sanika Gade
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com