पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या पहिल्या सुसज्ज जम्बो सेंटरचे लोकार्पण

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या पहिल्या सुसज्ज जम्बो सेंटरचे लोकार्पण
Saam Banner Template

पुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी पुणे शहरातील रुग्णालयांमध्ये येत असतात. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असतो. सध्या जरी पुण्यातील रुग्णसंख्या (Pune Coronavirus) ही कमी झाली असली, तरी ग्रामीण भागात आजही रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जम्बो सेंटर (Jumbo Covid Centre) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (Dedication of the first well equipped jumbo center in rural areas of Pune district)

जम्बो सेंटर उभारण्यासाठी यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. मात्र, आता हे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार अवसरी खुर्द येथे ऑक्सिजन प्लँट, 244 ऑक्सिजन बेड तर 48 ICU बेड (Oxygen) असलेले जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या जम्बो सेंटरमुळे आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर या तालुक्यांतील गरजू रुग्णांवर उपचार होऊ शकणार आहेत. 

हे देखील पाहा

जम्बो कोविड सेंटर येथे लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांच्या ठिकाणी  24 लाख रुपये संकलन निधीतून सुसज्ज जम्बो कोविड सेंटरचे लोकार्पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com