चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाऊंट बनवून पैशाची मागणी

चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाऊंट बनवून पैशाची मागणी
akola collector

अकोला - लोकांना फेक अकाउंट Fake Account द्वारे फसवणे हा नवीन प्रकार नाही. पण याचा फटका आता अकोला येथील जिल्हाधिकारी Collector जितेंद्र पापळकर Jitendra Papalkar यांना बसला आहे.याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक Facebook अकाऊंटवरून  शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना पैशांची मागणी सुध्दा करण्यात येत असल्याने चिंता वाढली आहे. Demand for money by creating Collectors fake account

अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे यांना बनावट अकाउंट वरून पैश्यांची मागणी करण्यात आली त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या संदर्भात अखिलेश हातवळणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली असून पोलिस यंत्रणा चौकशी करीत आहे. 

हे देखील पहा -

तसेच हा प्रकार प्रेस क्लबचे अध्यक्ष सुभाष गादिया यांच्यासोबत सुद्धा घडला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सायबर मध्ये तक्रार दिली आहे. याचा अधिक तपास सायबर पोलीस करीत आहे. मात्र अशा प्रकारे फेक फेसबुक अकाऊंट बनवून लुटणार्या टोळी पासून नागरिकांनी सावध राहावे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com