सहा वर्षांच्या चिमूरडीच्या तक्रारीने शिक्षण विभागाला लावले कामाला 

सहा वर्षांच्या चिमूरडीच्या तक्रारीने शिक्षण विभागाला लावले कामाला 
mahiraa.jpg

जम्मू काश्मीर :  कोविड 19 Covid 19  महामारीचा सर्वच स्तरावर परिणाम झाल्याचे आपण पाहत आहोत. अर्थव्यवस्थेपासून Economy ते रस्त्यावर भाजी विकणाऱ्या माणसापर्यंत सर्वांनाच कोविड आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनची Lockdown  झळ बसली आहे. शिक्षणक्षेत्रावर Education System  तर या महामारीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोविड महामारीमुळे जगभरात ऑनलाईन शिक्षण प्रणाली  Online Education System सुरू झाली खरी  पण आता हळूहळू याचा दुष्परिणाम होत असल्याचे ही समोर आले आहे. ऑनलाईन अभ्यास आणि तासनतास सुरू असलेल्या ऑनलाईन क्लासला वैतागून एक सहा वर्षांच्या मुलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार केली आहे. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरचे  उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे.  (The Department of Education changed the timing of the online class after a six-year-old girl complained) 
 
अभ्यासाचा ताण आणि  तासंतास सुरू असलेल्या ऑनलाईन क्लासला वैतागलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकली थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तीच्या तक्रारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर  प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांपर्यंत पोहचला. याची दखल घेत  उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शालेय मुलांवरील अभ्यासचा दबाव कमी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये शैक्षणिक धोरण बदलण्यास सुरुवात केली आहे. 

तासनंतास चालणाऱ्या ऑनलाईन क्लास आणि होमवर्कला वैतागलेल्या जम्मू काश्मीरच्या माहिरा Mahira नावाच्या चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात तिने थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे. '' सकाळी दहा वाजता  आमचा ऑनलाईन क्लास सुरू होतो आणि दुपारी दोन वाजता संपतो. यात आम्हाला इंग्रजी, गणित, उर्दू आणि ईव्हीएसचे क्लास असतात.  मोदीजी आम्हा लहान मुलांना एवढं काम का करावं लागतंय? असा सवाल तिने  या व्हिडओत विचारला आहे. तर सोशल मीडियावरही तो प्रचंड व्हायरल झाला.  महिराच्या या व्हिडओ नंतर इतर मुलांच्या पालकांनीही  ऑनलाईन क्लासच्या वेळेविरोधात  तक्रारी करायला सुरवात केली.   ही पाहता उपराज्यपालांनी जम्मू काश्मीरच्या शिक्षण विभागाला आदेश दिले आहेत. 

यानुसार,  जम्मू काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागानं पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांच्या दैनंदिन ऑनलाईन वर्गांची वेळ दीड तास केली  आहे.  हे क्लास दोन टप्प्यात होतील. तर, नववी ते बारावीचे ऑनलाईन क्लासही तीन तासाहून अधिक वेळ होणार नाही,  असं ट्विट करत मनोज सिन्हा यांनी शालेय विद्यार्थ्याना दिलासा दिला आहे.  याशिवाय त्यांनी आपल्या ट्विट मध्ये या चिमूकलीचा उल्लेखही केला आहे.  या चिमूकलीची तक्रार खूपच प्रेमळ आहे.  या तक्रारीची दखल घेत आम्ही शालेय विद्यार्थ्यांवरील  होम वर्कच ओझं कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला 48 तासांत योग्य धोरण आखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लहानपणाची निरागसता हे देवाच वरदान आहे आणि या बालपणाचे दिवस आनंदात, उत्साहात  जायला हवं. 

Edited By- Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com