उपसरपंचाकडून आशा वर्करवर प्राणघातक हल्ला

उपसरपंचाकडून आशा वर्करवर प्राणघातक हल्ला
Deputy Sarpanch attacked on Asha Worker.

यवतमाळ - उपसरपंचाने कर्तव्यावर असलेल्या दोन आशा वर्करवर Asha worker धारधार सूऱ्याने प्राणघातक हल्ला केला आहे . हा धक्कादायक प्रकार  यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील सायत खर्डा येथे घडला आहे. (Deputy Sarpanch attacked on Asha Worker)

कांलीदा डहाके आणि गंगा कुमरे असे या आशा वर्करवर उपसरपंच मधुसूदन याने प्राणघाती हल्ला केला. कांलीदा डहाके यांना डोक्यावर मार लागला असून त्यांना यवतमाळमधील  शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे . 

हे देखील पहा - 

एका आशा वर्कला डोक्यावर मार लागल्याने त्यांची तब्येत गंभीर आहे. तसेच गंगा कुमरे यांच्या हाताला गंभीर मार लागला आहे. मधुसूदन याला दारूचे व्यसन आहे. काही ना काही कारण शोधून हा या आशा वर्करला त्रास देत असतो.  

गेल्या ८ दिवसांपासून मधुसूदन हा या आशा वर्करचा पाठलाग करीत असल्याची तक्रार या आशा वर्करने केली होती. पारवा पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. नेमका हल्ला कशासाठी केला याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत अशी माहिती गोरख चौधर पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे . 
 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com