फडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...

फडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...
pula deshpande

पुणे : थोर साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांची आज पुण्यतिथी.....ज्यांच्या साहित्यानं अवघ्या महाराष्ट्राला हसवलं, हसता हसत डोळ्यांत अश्रूचा छोटासा थेंब आणला त्या पु. ल. देशपांडे Pu La Deshpande यांची आठवण आज सारा महाराष्ट्र Maharashtra काढतो आहे. मग राजकारणी तरी का मागं राहतील? पण ते करताना थोडं भान हवं ना....  Devendra Fadanvis tweet on Pu La Deshpande

आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही  Devendra Fadanvis यात मागे राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्त्वाला पुण्यतिथिनिमित्त अभिवादन करताना फडणवीसांनी एक ट्वीट Tweet केलं. हे ट्वीट तेवढंच हसवून गेलं...जेवढ्या पुलंच्या व्यक्तीरेखांनी हसवलं. या ट्वीटमध्ये फडणवीसांनी पुलंच्या तोंडी एक वाक्य घातलं आहे


प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे- पु. ल. देशपांडे....

पुलंनी अनेक व्यक्तिरेखा कागदावर रेखाटल्या..त्या व्यक्तीरेखांनी कधी मनमुराद हसवलं....अंतू बर्वा कोकणाचं तत्वज्ञान सांगून गेला, चितळे मास्तरांनी डोळ्यांत पाणी आणलं.....पेस्तनकाकांचा प्रेमळ पारशी मराठी माणसाच्या कायम राहिला....तसाच लक्षात राहिला तो सखाराम गटणे.....  Devendra Fadanvis tweet on Pu La Deshpande

पुस्तकातले किडे आजुबाजूला अनेकदा दिसतात. ते कायमच थट्टेचा विषय होतात...असाच हा गटणे....याचं पुस्तकं वाचण्याचं खूळ पुलंनाही अचंबित करुन गेलं होतं. सखाराम गटणे ही व्यक्तिरेखा ऐकताना किंवा 'व्यक्ती आणि वल्ली' वाचताना वाक्यावाक्याला मनाशी हसत जातो. त्यात गटणेच्या तोंडातून अतीवाचनानं बाहेर पडणाऱ्या सुभाषितांपैकी एक सुभाषित आहे.

....प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे

हे ऐकून पुलं त्याला विचारतात...कुणी म्हटलंय हे.....त्यावर गटणे उत्तर देतो....स. त. कुडचेडकर...'केतकी पिवळी पडली' चे लेखक ....ख्यातनाम!. त्यावर पुढं पुलं सांगतात की अशा नावाचा कुणी साहित्यिक मराठीत आहे याचा मला पत्ताही नव्हता. या गटण्याला मात्र त्याच्या...आता ते पुस्तक होतं...नाटक होतं की कादंबरी की आणखी काही होतं....त्यातली वाक्यंही तोंडपाठ होती. या गटण्याची केस अगदी हाताबाहेर गेली होती....  Devendra Fadanvis tweet on Pu La Deshpande

हे देखील पहा -

गटणेही व्यक्तिरेखा पुलंना खरोखरंच भेटली होती का हे आता समजायला वाव नाही. पण हे वाक्य त्यांनी विडंबनात्मक लिहलं आहे एवढं मात्र नक्की. मात्र, पुलंच्या साहित्य संग्रहातलं नेमकं हेच वाक्य फडणवीसांना कुणी शोधून दिलं, हा प्रश्न त्यांचे ट्वीट पाहून पडतोय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com