महालक्ष्मीला १६ किलो साेन्याची साडी अर्पण

 महालक्ष्मीला १६ किलो साेन्याची साडी अर्पण

पुणे : सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दस-यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे १६ किलो वजनाची ही साडी आहे.

वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली. 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी ही साडी नेसविण्यात येते.  दक्षिण भारतातील कारागिरांनी ८ वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते.

आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली असून, श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ९ वे वर्ष आहे. दस-याच्या दिवशी हळदी-कुंकू व ओटीच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप झाला.

Web Title: Devotee present Gold saree to Mahalaxmi devi in Pune

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com