धनंजय मुंडेंचा अनोखा सेवाधर्म 75 कुटुंबातील विवाहांना प्रत्येकी 10 हजारांची मदत..!
beed

धनंजय मुंडेंचा अनोखा सेवाधर्म 75 कुटुंबातील विवाहांना प्रत्येकी 10 हजारांची मदत..!

बीड - परळी Parli मतदार संघात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून अनोखा सेवाधर्म सुरु आहे. या कोविड काळात सामाजिक उपक्रमांतर्गत, परळीतील विविध भागातील काल एकूण 21 कुटुंबियांना प्रत्येकी 10 हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी प्रदान करण्यात आला आहे. Dhananjay Munde Helps Rs 10 Thousand Each For Marriages In 75 Families

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 75 कुटुंबांना मदत करण्यात आली असल्याची माहिती धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी दिली आहे. विशेष म्हणजे विवाह सहाय्य Help निधी देण्यात येणारी कुटुंबे Family ही सर्वसाधारण व गरीब परिवार आहेत.

लॉकडाउनमुळे Lockdown हातावर पोट असलेल्या अनेक व्यक्तींना आपल्या मुलीचे कन्यादान करणे हे एक मोठे आव्हान झाले आहे.अश्या काळात मुंडे यांनी केलेली मदत मोलाची ठरत असल्याची भावना या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. Dhananjay Munde Helps Rs 10 Thousand Each For Marriages In 75 Families

दरवर्षी आपण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह Marriage आयोजित करून गरीब व गरजू कुटुंबातील विवाहास सहाय्य करीत असतो. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमध्ये, हा सोहळा घेता आला नाही.

त्यामुळे सेवाधर्म या लोकोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून, कोरोना Corona बाधित झालेल्या गरजू कुटुंबातील विवाहासाठी, अर्थसहाय्य निधी देतोय. मी माझ्या मतदारसंघातील लोकांप्रती कर्तव्य निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

Edited By : Krushnarav Sathe

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com