11 जून पासून प्रत्यक्ष RTE प्रवेशाला सुरुवात 

11 जून पासून प्रत्यक्ष RTE प्रवेशाला सुरुवात 
RTE at amravati.jpg

वृत्तसंस्था : शैक्षणिक सत्र 2021-22 च्या आरटीई RTE 25   टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 11 जून पासून सुरू होणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार Right to education अधिनियम 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25  टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. याबाबतची सोडत  7 एप्रिलला काढण्यात आली होती. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 245 शाळा पात्र आहेत. अमरावतीचे प्राथमिक वर्गाचे शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी याबाबत माहिती दिली आहे.  (Direct RTE access begins June 11) 

प्रथम फेरीतील 1980 विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत निवड यादीत  लॉटरी लागली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्याच  पालकांनी शाळेत  जाऊन दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करावयाचा आहे. 

जिल्हयातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेवून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता 20 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करु नये. अशा सूचना ही पालकांना देण्यात आल्या आहे.   

ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मुळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन , आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश  निश्चित करावा लागणार आहे. बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात. त्यामुळे रहिवासी पत्याचा पुरावा इ. कागदपत्रांवरुन शाळा व निवासी पत्याच्या अंतराची पडताळणी करावी. 

सदर निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देवू नये. असे आदेश देण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता,  जे पालक प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येवू शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे, व्हॉट्सअॅपद्वारे शाळेत संपर्क करुन प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी. असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 

Edited By- Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com