जालना जिल्यात कोरोनाच्या लसींच समान वाटप करा: रावसाहेब दानवेंची मागणी

जालना जिल्यात कोरोनाच्या लसींच समान वाटप करा: रावसाहेब दानवेंची मागणी
danve

जालना : जालना Jalna जिल्ह्यात कोरोनावरील Corona लसींचं समान वाटप होत नाही. तर जिल्ह्यातील काही भागांना जास्त प्रमाणात लसींचं Vaccines वाटप होत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री Union Minister of State आणि भाजप BJP नेते रावसाहेब दानवेंनी Raosaheb Danve केला आहे. Distribute corona vaccines equally in Jalna district demand of Raosaheb Danve

आज जालन्यात भाजपच्या वतीने रक्तदान शिबिर Blood Donation Campaign घेण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटनंतर ते बोलत होते. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरात रक्तदान शिबिर घेण्यात यावे असा आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आला होता असे दानवे यांनी म्हटले आहे.

हे देखील पहा - 

जालना जिल्ह्यातील काही भागात ऑक्सिजन प्लँट Oxygen Plants उभारले जात आहेत. तर रेमडेसिवीर इंजेक्शन Remdesivir, कोरोनावरील लसींचं जिल्ह्यात समान वाटप व्हायला हवं अशी मागणीही दानवेंनी यावेळी केली आहे.

'आरोग्य विभाग Health Department कोरोनाची जनजागृती करण्यात कमी पडला असून शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक प्रमाणात जनजागृती व्हायला हवी; असेही दानवे म्हणाले आहेत.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com