कोरोनासाठी 'आयुष 64' औषधांचे गोव्यात वितरण
dr pramod sawant

कोरोनासाठी 'आयुष 64' औषधांचे गोव्यात वितरण

देशभर कोरोना रुग्ण (Coronavirus In India) संख्या वाढत असताना केंद्रीय आयुष मंत्रालयाने (Ministry Of Ayush) सर्व परवानग्या घेऊन कोरोना रुग्णांसाठी 'आयुष 64' हे (Ayush 64) औषध लॉन्च केले आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे औषध वेगवेगळ्या रुग्णालयांना आणि कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्या संस्थांना पणजी इथे वितरित केले आहे.

कोरोना आल्यानंतर आयुष मंत्रालयाकडे वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक फार्मूले आले होते. यावरती संशोधन आणि चाचण्या झाल्यानंतर आता हे औषध मंत्रालयाने जाहीर करत रुग्णांना वितरित करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या ज्या रुग्णांना कोणतेही लक्षणं नाहीत किंवा कमी लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध उपलब्ध केलं आहे. (Distribution of 'AYUSH 64' drugs for Corona in Goa)

रामदेव बाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातल्या वादामुळे रुग्णांचे नुकसान होत आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनचा पूर्वीपासूनच सहकार्याची भूमिका नाही. पॅथी कोणती असू रुग्ण बरा झाला पाहिजे हे आयुष मंत्रालयाचं धोरण आहे. सध्याच्या कोरोनाच्या भयानक स्थितीमध्ये वादापेक्षा रुग्णांचे आरोग्य महत्त्वाचा आहे. असे मत आयुष मंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. आता आयुष मंत्रालयाने बाजारात आणलेले हे औषध कितपत यशस्वी होणार हे येणारा काळच ठरवेल .

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com