कोरोना लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी 'ही' शोधली शक्कल

कोरोना लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी 'ही' शोधली शक्कल
Thane Distict Hospital

ठाणे : कोरोनाचा Corona प्रादुर्भाव हा महाराष्ट्रभरात Maharashtra वाढत असतानाच लसीकरण Vaccination देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.  परंतु लसीचा कमी प्रमाणात असणारा पुरवठा यामुळे लसीकरणात खंड पडत आहे. ठाणे Thane शहरात देखील अशीच परिस्थिती ही उद्भवलेली आहे. District Surgeon finds a way for co-ordination in vaccination

सुरुवातीच्या काळात फ्रंटलाइन वर्कर Frontline Workers आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना Health Workers लसीकरण देण्यात आले होते. त्या वेळी लसीचा पुरवठा हा सुरळीत होत होता. परंतु त्यानंतर 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीचा पुरवठा हा अपुरा असल्याने व लोकांची मागणी वाढत असल्याने लसीकरणामध्ये खंड येऊ लागला आहे. 

या सर्व लसीकरण प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ठाणे जिल्हा चिकिस्तक कैलास पवार यांनी नवीन शक्कल लढवून कलर कोड कुपण Coupons सिस्टम अमलात आणली आहे. ठाणे शहरात देखील 18 ते 45 वयोगटातील व 45 वर्षावरील वयोगटात लसीकरण हे सुरू आहे.

परंतु सध्या सुरू असलेल्या कूपन सिस्टम मुळे अधिकच गोंधळ उडत आहे नागरिकांनी घेतलेले कुपन हे दुसऱ्या दिवशी देखील लसीकरणासाठी वापरात आणले जात आहे, असे  निदर्शनास आले म्हणून वयोगटानुसार उपलब्ध असलेल्या लसींचा साठा बघून पिवळा, हिरवा, केशरी, गुलाबी, पांढरा, आणि निळा अशा सहा रंगाचे कुपन हे देण्यात येणार आहेत. दर दिवशी हे कुपन वयोगटानुसार बदलून देणार आहे. जेणेकरून आज घेतलेले कुपन हे दुसऱ्या दिवशी च्या वयोगटाला साम्य होणार नाही. 

Edited By - Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com