अबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड !

अबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड !
tree

लातूर : लातूर Latur शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन वृक्ष अनधिकृतपणे तोडल्यामुळे महानगरपालिकेने एका डॉक्टरला तब्बल एक लाखांचा दंड ठोठावला आहे. शहरातील शिवाजीनगर भागातील आकाश कॉम्प्लेक्सपुढे ३० फूट उंचीची बदामाची दोन झाडं होती. Doctor was fined Rs one lakh for cutting down two trees

या दोन झाडांचा अडथळा डॉ.सोमाणी यांच्या आकाश कॉम्प्लेक्सला होत होता. त्यामुळे डॉ. ओमप्रकाश सोमाणी यांच्या सांगण्यावरून ही दोन्ही झाडे रात्रीच्या वेळेस तोडण्यात आली. मात्र अनधिकृतपणे रस्त्यावरील झाडे तोडल्याची बाब पुढे आली.

त्यामुळे महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे जतन अधिनियम १९७५ कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपा Muncipal Corporation आयुक्त Commissioner अमन मित्तल यांनी तब्बल एक लाखांचा दंड Fine ठोठावण्यात आला आहे. 

हे देखील पहा -

प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे दोन झाडांच्या एक लाख रुपये दंडाची नोटीसही  जागामालक पुष्पा ओमप्रकाश सोमाणी यांना पाठवली आहे. दरम्यान डॉ. सोमाणी यांनी आता सारवासारव करण्यासाठी कापलेल्या झाडांच्या ठिकाणी दोन वृक्षही लावली आहेत.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com