चक्क! कुत्रा बनला कृषी अधिकारी;  युवा सेनेचं अनोखं आंदोलन
dog.

चक्क! कुत्रा बनला कृषी अधिकारी; युवा सेनेचं अनोखं आंदोलन

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने भोंगळ कारभाराचा कळस गाठला असून तालुका कृषी अधिकारी आर. माने सतत कार्यालयातून गैरहजर राहतात. आज युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांना घेउन कृषी अधिकारी कार्यालयात धडक दिली असता कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहून संतप्त होत तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीत चक्क कुत्र्याला बसवून अनोखे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी बियाण्या संदर्भात व इतर शेकडो तक्रारी कृषी अधिकारी कार्यालयात केल्या आहे. परंतु, सदर तक्रारीची दखल न घेतल्यायामुळे  आणि तालुका कृषी अधिकारी आर.माने हे सतत कार्यालयातून गायब असतात या आठवड्यात सुद्धा तीन दिवसापासून माने कार्यालयातून गायब असल्यामुळे कृषी अधिकारी गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.(The dog became an agricultural officer Unique movement of Yuva Sena) 

हे देखील पाहा

शेतकरी बियाणे संदर्भात तक्रारी घेऊन गेले असता तेथे कोणीही चर्चा करण्यास आले नाही व कार्यालयातील बहुतांश खुर्च्या रिकाम्या असल्यामुळे युवा सैनिकांनी संतप्त होत अधिकानऱ्यांचे खुर्चीवर चक्क कुत्र्याला बसवून अनोखे अंदोलन केले.  आपला तीव्र संताप व्यक्त करत खुर्चीला तक्रारी चिटकवल्या व निषेध व्यक्त केला.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com