महिलांकडून पुरुषांचा छळ, पीडित पुरुषांच्या तक्रारी वाढल्या

महिलांकडून पुरुषांचा छळ, पीडित पुरुषांच्या तक्रारी वाढल्या
domestic volinace

नागपूर - घरगुती कारणांमुळे महिलांचा होणारा छळ, तक्रारी आणि पुरुषांवर होणारी पोलिसांची कारवाई यात काही नवीन नाही. मात्र, आता पत्नीकडून पतीच्या छळाच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागपूरच्या भरोसा सेल मध्ये पुरुषांच्या छळाच्या तक्रारी 10 टक्क्यांवर गेल्या आहेत.  domestic violence against men in nagpur

कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेकांचे कामधंदे बंद होते, अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. त्यामुळे घरी असल्याने कुटुंबात सुखसंवाद वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, झालं उलटच. पती घरी राहिल्यानं तो प्रत्येक कामात नाक खुपसतो, पत्नीला मनमोकळे पणाने जात येत नाही, ऑर्डर देत असतो, या कारणांनी संशयकल्लोळ वाढलाय.

यातून अनेक कुटुंबात संवादा ऐवजी वाद वाढला आहे. 2020 मध्ये पुरुषांच्या छळाच्या तक्रारी 1438 होत्या. तर 1 जानेवारी ते 13 जून पर्यंत तक्रारी आल्या आहेत. मात्र, याचा परिणाम मुलांवर होतोय. domestic violence against men in nagpur

हे देखील पहा -

घरी राहिल्यानं सतत हे कर, ते कर, हे केलं नाही, घर स्वच्छ केले नाही, आईला वेळेवर जेवण दिले दिले नाही, मोबाइल वर खूप बोलते, अशा लहान सहान गोष्टी मध्ये नवरा नाक खुपसतो. त्यामुळं पत्नी सतत पतीला टोमणे मारले जातात. त्यातून तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, त्यामुळे मुलांवर परिणाम होतो. त्यामुळं लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करून मुलांच्या भविष्यासाठी समजूतदारपणे वागण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com