कोविड सेंटरमध्ये जायचं नाहीये? मग पोलिस येतील घरी!

कोविड सेंटरमध्ये जायचं नाहीये? मग पोलिस येतील घरी!
Saam Banner Template

पिंपरी चिंचवड - घरामध्ये Home राहून उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना Corona Patient कोविड सेंटर Covid Centre मध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले खरे , मात्र अनेक कोरोना बाधित, कोविड सेंटर मध्ये जाण्यास नकार देत असल्याचे प्रकार समोर आल्याने, पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad महापालिका Corporation प्रशासन आणि पोलिसांनी Police कठोर पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे.  Dont want to go to covid Center Then the police will come home

कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने पिंपरी - चिंचवडमध्येही कोरोनाची दुसरी लाट ओसरतांना दिसत आहे. त्यामुळे आता कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने नव्या नियमांप्रमाणे होमक्वारटाईन असलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये मध्ये स्थलांतरीत करणं गरजेचं आहे. मात्र अनेक रुग्ण स्थलांतरित होण्यासाठी नकारा देत असल्याने  त्यांची मनधरणी करतांना प्रशासनाच्या नाकीनव येत आहे. 

हे देखील पहा -

घरी असलेल्या रुग्णांना विंनती करून देखील ते कोविड सेंटरमध्ये जाण्यास इच्छुक नसल्याचं बघून पिंपरी -  चिंचवड पोलिसांनी कठोर पाऊलं उचलत रस्त्यावर दिसेल त्यांची चाचणी करण्यास सुरवात केली आहे. या चाचणीत कोणताही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला, तर उपचारासाठी त्यांची रवानगी थेट कोविड सेंटर मध्ये केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Dont want to go to covid Center Then the police will come home

पिंपरी - चिंचवडमधील परिस्थिती हातात असली तरीही इथला मृत्युदर पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट असून तो अजूनही कायम आहे. नेमकी हीच गंभीर बाब पिंपरी - चिंचवडकरांनी लक्षात घेत, कोरोना विरोधातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कारण आता आपण प्रशासनाला सहकार्य केलं तरच भविष्यात येणाऱ्या लाटेचा आपल्याला सामना करता येईल या वास्तवाचं भान प्रत्येकांनी ठेवायला हवं.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com