2-DG: तंत्रज्ञान हस्तातरणांसाठी डीआरडीओने मागवले अभिप्राय 

2-DG: तंत्रज्ञान हस्तातरणांसाठी डीआरडीओने मागवले अभिप्राय 
DRDO 2 dg.jpg

वृत्तसंस्था : कोविड 19 च्या उपचारासाठी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) च्या 2-डीओक्सी-डी-ग्लूकोज (2-DG) औषधला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने Drugs Controller General of India आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. त्यानंतर आता देशभरातील कोविड 19 Covid 19  रुग्णांवर उपचार करण्यासाठी या औषधाचा वापर करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर आता डीआरडीओकडून  2-डीजीचे तंत्रज्ञान हस्तांतरणांसाठी Technology transfer देशभरातील औषध निर्माता उद्योगांकडून अभिप्राय म्हणजेच विनंती अर्ज (Expression of Interest) मागविण्यात आले आहेत.  (DRDO invites pharmaceutical companies for technology transfer of 2-DG) 

भारतीय औषधी उद्योग डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या Dr. Reddy's Laboratories सहकार्याने डीआरडीओच्या प्रयोगशाळेतील न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) या संस्थेने  2-डीओक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी)  चे उत्पादन विकसित केले आहे. वैद्यकीय चाचण्यांमध्येही या औषधांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.  या औषधांच्या सेवनामुळे रुग्णांचे  कृत्रिम ऑक्सिजनवरील अवलंबीत्व कमी होते तसेच रुग्ण  जलद गतीने बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.   विशेष म्हणजे  2-डीजीने उपचार केलेल्या कोविड रूग्णांमध्ये आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल नकारात्मक  आल्याचे दिसून आले आहे. 

भारतीय औषधी उद्योग डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने डीआरडीओच्या प्रयोगशाळेतील न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) या संस्थेने  2-डीओक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी)  चे उत्पादन विकसित केले आहे. वैद्यकीय चाचण्यांमध्येही या औषधांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. DRDO ने विकसित केलेले हे औषध पावडर स्वरुपात पाकिटामध्ये  मिळते.  हे औषध पाण्यात विरघळवून पिता येते.  हे औषध सेवनाने संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन  विषाणूचे संक्रमण आणि  निर्मिती थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते.

वैद्यकीय चाचण्यांमधून समोर आलेल्या  परिणामांनुसार, इतर औषधांच्या तुलनेने 2DG औषधाच्या सेवनाने रुग्ण कमी वेळेत कोरोनातून बरा होतो.  तसेच रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्वही कमी होते. 

तंत्रज्ञान हस्तांतरण बोली लावणाऱ्या औषध निर्माता कंपनीकडे सक्रिय औषधनिर्माण घटकाचा Active Pharmaceutical Ingredient परवाना असावा. तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे चांगले उत्पादन सरावाचे  Good manufacturing Practices प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल.  तथापि, 2-डीजीसाठी प्रारंभिक सामग्री म्हणून डी-ग्लूकोज हे  प्रयोगशाळा संश्लेषण प्रक्रिया वापरून विकसित करण्यात आले आहे. संश्लेषण प्रक्रियेत शुध्दीकरणानंतरच्या पाच रासायनिक  प्रक्रियाद्वारे डी-ग्लूकोजचे 2-डीजीमध्ये रूपांतर होते. ही प्रक्रिया बॅच स्केल (100  ग्रॅम) आणि पायलट प्लांट स्केल (500 ग्रॅम) वर स्थापन केली आहे. त्याचबरोबर, डीआरडीओकडून या संदर्भात आवश्यक पेटंटदेखील दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती संरक्षण समितीने दिली.

Edited By- Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com