स्वतः जेसीबी चालवत आमदार दिलीप लांडेनी केली तोडक कारवाई ला सुरुवात

स्वतः जेसीबी चालवत आमदार दिलीप लांडेनी केली तोडक कारवाई ला सुरुवात
mumbai

मुंबई : गेले पंधरा वर्षे रुंदीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या अंधेरी Andheri कुर्ला रोड साकीनाका बाजूच्या रुंदीकरणाचा टप्पा आज पार पडला. या वेळी स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या सह शिवसैनिक ShivSainik मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करीत भगवे झेंडे, फलक घेऊन या तोडक कारवाई च्या ठिकाणी दाखल झाले होते. Driving JCB MLA Dilip Lande Started Crackdown

या रुंदीकरणामध्ये सर्वात मोठा अडथळा हा येथील दुकानांच्या पुनर्वसन आणि तोडक कारवाई चा होता. मात्र गेल्या वर्षभरात पालिकेने अगदी झपाट्याने हा विषय मार्गी लावत टप्प्या टप्प्यात तोडक कारवाई केल्या आणि तितका रस्ता बनवून घेतला आहे. 

साकीनाका Sakinaka वरून कुर्ला कडे जाताना एक मार्ग हा विमानतळाकडे देखील जात असल्याने इथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीला वाहन चालकांना सामोरे जावे लागत होते. मात्र आज च्या टप्प्यात झालेल्या तोडक कारवाई आणि रस्ते रुंदीकरण  Widening मुळे आता विमानतळाकडे जाणाऱ्या रस्तापर्यंत रस्तारुंदीकरण होत आहे. Driving JCB MLA Dilip Lande Started Crackdown

तर साकीनाका जंक्शन जवळील तोडक कारवाई मध्ये स्वतः आमदार MLA दिलीप लांडे Dilip Lande यांनी जेसीबी चालवत तोडक कारवाई ला सुरुवात केली. पुढील काही महिन्यात आता कुर्ला Kurla बाजूने देखील अंतिम तोडक कारवाई Action देखील पार पडेल असे या वेळी आमदार लांडे म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com